Share

Chitra Wagh | संजय राऊतांच्या डोक्यावर जेलमध्ये गेल्यामुळे परिणाम झालाय – चित्रा वाघ

Chitra Wagh | गोंदिया: आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे.

सध्याच्या सरकारने घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरणार. त्याचबरोबर सध्याचं सरकार प्रत्येक संकटापासून दूर पळत आहे. या सरकारचा अंत्यविधी आम्ही थाटात करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay Raut has been in jail for 103 days – Chitra Wagh

‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानासाठी चित्रा वाघ (Chitra Wagh) गोंदिया जिल्ह्यामध्ये दाखल झाल्या आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी संजय राऊत यांच्या टिकेला सडेतोड उत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, “संजय राऊत 103 दिवस जेलमध्ये राहून आलेले आहे. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते अशा प्रकारची विधान करत असतात.”

दरम्यान, आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “भारतीय सैन्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल अतिरेक्यांकडून हत्या झाली आहे.

या घटनेनंतर देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली. मात्र, ही घटना घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत भाजप कार्यालयामध्ये स्वतःवर पुष्पवृष्टी करून घेत होते.

हा या सरकारचा सनातन धर्म आणि भारत आहे. आमचा हा सनातन धर्म आणि भारत नाही. सध्याचं सरकार अत्यंत बेकायदेशीर आणि डरपोक आहे. प्रत्येक संकटापासून हे सरकार पळून जात आहे. त्यामुळे या सरकारचा अंत्यविधी आम्ही थाटात करू

महत्वाच्या बातम्या

Chitra Wagh | गोंदिया: आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप सरकारवर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now