Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या (16 सप्टेंबर) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारचा एक नियम मोडीत काढला आहे. आतापर्यंत मराठवाड्यामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात असायचा.
मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.
ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी.
विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी. दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?
फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री), ताज हॉटेल 40 रूम बुक (सर्व सचिव), अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – 20 ( इतर अधिकारी) एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत.मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे.”
Sanjay Raut will attend Eknath Shinde’s press conference as a journalist
दरम्यान, या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार म्हणून उपस्थित राहणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला आपण पत्रकार म्हणून जाणार असल्याचं आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्नही विचारणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Prakash Ambedkar | निवडणुकांपूर्वी देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होणार – प्रकाश आंबेडकर
- Sanjay Raut | CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत जाणार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Keshav Upadhye | उद्धव ठाकरेंचं सरकार खुर्चीच्या हव्यासापोटी बनलेलं होतं – केशव उपाध्ये
- Vijay Wadettiwar | शिंदे-फडणवीस-पवार विकासाच्या नावानं तिजोरी ओरबडताय – विजय वडेट्टीवार
- Ashish Shelar | ‘दैनिक सामना’चे काम मोदींशिवाय चालणार नाही – आशिष शेलार