Share

Ashish Shelar | ‘दैनिक सामना’चे काम मोदींशिवाय चालणार नाही – आशिष शेलार

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सैन्यातील चार जवानांना काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढत असताना वीरमरण पत्करावं लागलं आहे. हा सर्व प्रकार घडत असताना भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात मोठा कार्यक्रम पार पडला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. … Read more

Published On: 

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सैन्यातील चार जवानांना काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढत असताना वीरमरण पत्करावं लागलं आहे. हा सर्व प्रकार घडत असताना भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात मोठा कार्यक्रम पार पडला.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दैनिक सामना’चे काम मोदींशिवाय चालणार नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

How much the egoists are afraid of Narendra Modiji – Ashish Shelar

भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्विट करत आशिष शेलार म्हणाले, “अहंकारी लोकांना बघा नरेंद्र मोदीजींची किती भीती आहे. देशातील 140 कोटी जनता फक्त मोदी मोदी म्हणत आहे.

मोदींना देशासह परदेशातही अत्यंत प्रेम मिळत आहे. संजय राऊत यांना टीका करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचं नाव घ्यावं लागतं. ‘दैनिक सामना’चे काम मोदींशिवाय चालणार नाही. तुमची इंडिया आघाडी हिरण्यकशिपूपेक्षा अधिक बिघडलेली आहे.”

दरम्यान, आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. देशाच्या अखंडतेविषयी, एकात्मतेबाबत मोदी सरकारने दिलेली सर्व वचने फोल ठरली आहेत.

जम्मू-कश्मीर हा तर संवेदनशील विषय आहे. तेथे आजही जवानांच्या रक्ताचे सडे पडत आहेत आणि येथे राज्यकर्ते स्वतःवर फूल- पाकळ्यांचे सडे पाडण्यात धन्यता मानत आहेत.

संसदेच्या विशेष सत्रात चर्चा जरा यावरही होऊ द्या. जम्मू- कश्मीरच्या भूमीवर हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना आमचे अभिवादन! फुलांचे सडे सुकून जातील, तुमच्या रक्ताचे सडे देश सदैव स्मरणात ठेवील.

पंतप्रधान मोदी यांच्यावर दिल्लीत जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली फुलांचा वर्षाव होत असताना मोदी भाजप कार्यकर्त्यांना सुहास्य वदनाने हात वगैरे उंचावून अभिवादन करत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत मोदींवर फुलांचे सडे उधळले जात असताना जम्मू कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आपल्या जवानांच्या रक्ताचे सडे पडत होते. असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही