Keshav Upadhye | उद्धव ठाकरेंचं सरकार खुर्चीच्या हव्यासापोटी बनलेलं होतं – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

सध्याच्या सरकारने घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरणार. त्याचबरोबर हे सरकार प्रत्येक संकटापासून पळ काढत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

How long will Sanjay Raut remain misunderstood? – Keshav Upadhye

संजय राऊत यांच्या टीकेला केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. केशव उपाध्ये म्हणाले, “संजय राऊत किती दिवस गैरसमजात राहणार?

उध्दव ठाकरे सरकार बेकायदेशीर, जनतेच्या मनाविरुद्ध, फक्त खुर्चीच्या हव्यासापोटी बनवलेले सरकार होते, ते तर कधीच हद्दपार झाले. मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळताना बघुन ज्यांचा आणि विकासाचा संबंधच येत नाही अशा लोकांना त्रास होणारच!”

दरम्यान, काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात चार भारतीय जवानांना वीरमरण आलं आहे. ही घटना घडत असताना भाजपच्या कार्यालयात मोठा कार्यक्रम सुरू होता. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले, “सध्याचं सरकार बेकायदेशीर आणि डरपोक आहे. प्रत्येक संकटापासून हे सरकार पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. काल अतिरेकी हल्ल्यामध्ये भारतीय सैन्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या झाली.

या घटनेनंतर देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली आहे. मात्र, ही घटना घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दिल्लीत भाजप कार्यालयात उत्साह साजरा करत होते.

हा त्यांचा भारत आणि त्यांचा सनातन धर्म आहे. हा आमचा भारत आणि सनातन धर्म नाही. राजकीय कारणासाठी त्यांनी इंडियाचं भारत केलं. मात्र, नाव बदलून समस्या सुटत नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.