Share

Vijay Wadettiwar | शिंदे-फडणवीस-पवार विकासाच्या नावानं तिजोरी ओरबडताय – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | मुंबई: विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार सातत्याने राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल करताना दिसत आहे. अशात आज विजय वडेट्टीवार यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. यावेळी बोलत असताना वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना धारेवर धरलं आहे. शिंदे-फडणवीस-पवार … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | मुंबई: विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार सातत्याने राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल करताना दिसत आहे. अशात आज विजय वडेट्टीवार यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे.

यावेळी बोलत असताना वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना धारेवर धरलं आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकार विकासाच्या नावानं तिजोरी ओरबाडत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis is in charge of BJP MLAs – Vijay Wadettiwar

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदारांची जबाबदारी अजित पवारांकडे असून भाजपच्या आमदारांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.

या पार्श्वभूमीवर हे तिघ विकासाच्या नावावर तिजोरी ओरबाडत आहे. हे तिघं डाकू आणि लुटेरे आहे. यांना सरकारची तिजोरी साफ करायची आहे. जनतेचा नाही तर आमदारांचा विकास करण्याचा यांचा प्लॅन आहे.”

अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज शरद पवारांसोबतच्या बैठकीला पाठ फिरवली असल्याचं बोललं जात आहे.

यावेळी बोलत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या मुद्द्यावर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे, हे अत्यंत स्पष्ट झालं आहे.

दोन्ही गटांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू असल्याने शरद पवारांसमोरून अजित पवार जात नाही, ते मागून जातात. अजित पवार यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून त्यांच्या चेहऱ्यावर गिल्टीपणा दिसून येतो.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही