Share

Sanjay Raut | CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत जाणार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sanjay Raut | छत्रपती संभाजीनगर: उद्या (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे.

त्यांच्या या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत पत्रकार म्हणून उपस्थित राहणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेला आपण पत्रकार म्हणून जाणार असून मुख्यमंत्र्यांना प्रश्नही विचारणार असल्याचं स्वतः संजय राऊत यांनी सांगितलं आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

The state cabinet meeting will be held in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारचा नियम मोडीत काढला आहे.

आतापर्यंत मराठवाड्यामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहात थांबायचे. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे.

दरम्यान, आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.

ते म्हणाले, “काल काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात भारतीय सैन्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या झाली आहे. या हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबावर आणि आमच्यावर शोककाळा पसरली आहे.

तर दुसरीकडे नरेंद्र मोदी संपूर्ण भारतीय जनता पक्षासोबत दिल्लीतील कार्यालयात उत्साहात साजरा करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःवर पुष्पवृष्टी करून घेत होते.

हा त्यांचा सनातन धर्म आणि त्यांचा भारत आहे. हा सनातन धर्म आणि भारत आमचा नाही. देशाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कारण सध्याचं सरकार प्रत्येक संकटापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

Sanjay Raut | छत्रपती संभाजीनगर: उद्या (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now