Share

Prakash Ambedkar | निवडणुकांपूर्वी देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होणार – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. अशात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणुकांपूर्वी देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होणार असल्याचं प्रकाश आंबेडकर … Read more

Published On: 

Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे.

अशात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणुकांपूर्वी देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Important religious places of the country will be attacked – Prakash Ambedkar

पत्रकार परिषदेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हिंदू धर्मियांच्या मतांचं ध्रुवीकरण करून आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.

याआधी त्यांनी औरंगजेबाच्या नावाने राजकारण केलं. त्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर आता त्यांच्याकडून देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ला केला जाणार आहे.

यामध्ये अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर, जम्मू येथील वैष्णोदेवी मंदिर, वाराणसी येथील ज्ञानव्यापी मज्जिद, दिल्लीच स्वामीनारायण मंदिर आणि अक्षरधाम मंदिर यांचा समावेश असेल.

त्यामुळं निवडणुका होईपर्यंत भारतीय सैन्याने या सर्व मंदिरांवर ताबा घ्यावा, अशी आमची मागणी आहे. ही खात्रीशीर माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याचबरोबर ही माहिती शासनाच्या गुप्तहेर खात्यापर्यंत देखील पोहोचली आहे.

पुढे बोलताना ते (Prakash Ambedkar) म्हणाले, “भारतीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची धार्मिक ध्रुवीकरण करण्याची वृत्ती आहे. आम्हाला त्यांच्या या वृत्तीला चालना मिळू द्यायची नाही.

देशात अशांतता पसरवण्यासाठी हिंदू मंदिरांवर हल्ला केला जाणार आहे. निवडणुकीमध्ये धार्मिक रंग मिसळू नये, हा आमचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे भारतीय सैन्यांनी या मंदिरावर ताबा घ्यावा.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही