Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची उद्या (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक होणार आहे.
या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाचा एक नियम मोडला आहे. मराठवाड्यामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहामध्ये असायचा.
मात्र, यावेळी ही व्यवस्था शासकीय विश्रामगृहामध्ये न करता पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.
Eknath Shinde is staying in a five star hotel
नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. पुरेसा पाऊस न पडल्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलन रस्त्यावर उतरले आहे.
मराठवाड्यामध्ये एवढी गंभीर परिस्थिती असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत. सर्वसामान्य जनता संकटात असताना राज्य मंत्रिमंडळ आपल्या बैठकीवर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. सध्याचं सरकार संवेदनशील नाही. सध्याचं सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे.”
पुढे बोलताना ते (Nana Patole) म्हणाले, “मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न सुटणार असतील तर त्या बैठकीचं आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यासाठी हा एवढा थाट कशाला हवा?
यापूर्वी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेकदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. त्यावेळी सर्व मंत्र्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात असायचा. परंतु, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करत आहे.
हा बडेजाव करण्याची काहीच गरज नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर शासकीय विश्रामगृहात थांबले असते, तर त्यांना मराठवाड्यातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करता आली नसती का?
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी; वडेट्टीवारांनी CM शिंदेंना धारेवर धरलं
- Prakash Ambedkar | निवडणुकांपूर्वी देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होणार – प्रकाश आंबेडकर
- Sanjay Raut | CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत जाणार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Keshav Upadhye | उद्धव ठाकरेंचं सरकार खुर्चीच्या हव्यासापोटी बनलेलं होतं – केशव उपाध्ये
- Vijay Wadettiwar | शिंदे-फडणवीस-पवार विकासाच्या नावानं तिजोरी ओरबडताय – विजय वडेट्टीवार