Rohit Pawar | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज – रोहित पवार

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज (16 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.

मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान आतापर्यंत मुख्यमंत्र्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र, यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्र्यांचा मुख्य मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. विरोधकांच्या या टीकांनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहामध्ये हलवला असल्याची माहिती आली आहे.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगरला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील जनतेला न्याय देणारी व्हावी, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

The meeting of the cabinet should be a real justice to the people – Rohit Pawar 

ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील जनतेला न्याय देणारी व्हावी.. आजची परिस्थिती बघता राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज आहे…

कारण पाऊस नसल्याने खरीप तर हाताचा गेलाच पण आता पिण्याचं पाणी आणि जनावरांना चारा या समस्येला तोंड द्यावं लागणार आहे, शिवाय सामान्य कुटुंबातील मुलांना शाळेची फी भरणही कठीण आहे…

त्यामुळे राज्य सरकारने राज्याच्या हितासाठी स्वतःच्या #ट्रिपल_इंजिनला दिल्लीच्या #जंबो_इंजिनाची जोड देऊन दुष्काळामुळं निर्माण झालेले प्रश्न सोडवावेत, ही विनंती!”

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ बैठकीवरून ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून देखील राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. “छत्रपती संभाजीनगरात आज होणाऱया राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी लाखो रुपये खर्च करून शहरातील एकूण एक सारी महागडी हॉटेल्स सरकारकडून बुक करण्यात आली.

अशा पंचतारांकित वातावरणात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून ही बैठक पार पडेल. म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीसाठी नाव मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचे आणि बाता मराठवाड्यातील दुष्काळावर फुंकर वगैरे मारण्याच्या असल्या तरी बैठकीचा सगळा थाटमाट राजेशाहीच आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव आणि दुष्काळ राहिला बाजूला, राज्य सरकारने आपल्या राजेशाही थाटाचेच दर्शन मराठवाड्याला घडवले.

आज मराठवाड्यात मुख्यमंत्री येतील व झेंडा फडकवून निघून जातील. मराठवाडी जनता मात्र पुन्हा एकदा फसवणुकीच्या ओझ्याखाली चिरडून जाईल” असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.