Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण या बैठकीमध्ये मराठवाड्यातील समस्यांवर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
There is a tussle for ministerial posts in the state government – Aditya Thackeray
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री पदासाठी भांडण सुरू आहे.
त्यामुळं ते लोक शेतकरी, महिला अत्याचार, उद्योग, रोजगार इत्यादी समस्यांवर बोलायला तयार नाही. आजच्या बैठकीमध्ये शासन 50 हजार कोटींची घोषणा करेल. मात्र, या घोषणा फक्त घोषणाच राहतात. प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नाही.”
पुढे बोलताना ते (Aditya Thackeray) म्हणाले, “गेल्या वर्षी ओला दुष्काळ पडला होता. त्यानंतर यावर्षी कोरडा दुष्काळ पडला आहे. यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र, अजून राज्यात दुष्काळ जाहीर झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमान वापरण्यावर बदल केला आहे.
आता काही नेते घरचे कार्यक्रम असेल तर त्यासाठी विमान घेऊन जाऊ शकतात. यासाठी वापरला जाणारा पैसा जनतेचाच आहे. त्यामुळं सध्याचं सरकार खरंच संवेदनशील आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | माझी इच्छा झाली तर मी CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाईल – संजय राऊत
- Jayant Patil | मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती असताना मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचं रूप – जयंत पाटील
- Sanjay Raut | CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेचा पास संजय राऊतांना मिळाला, मात्र…
- Rohit Pawar | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज – रोहित पवार
- Uddhav Thackeray | देव-देवतांची फसवणूक करायला हे सरकार मागे पुढे पाहत नाही; ठाकरे गटाची टीका