Sanjay Raut | छत्रपती संभाजीनगर: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक पार पडणार आहे.
या बैठकीनंतर होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली होती.
या पत्रकार परिषदेसाठी संजय राऊत यांना पास देखील मिळाला असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली होती. यानंतर संजय राऊत यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.
I am the most senior editor in Maharashtra – Sanjay Raut
आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “पोलीस आयुक्तांकडे या मुद्द्याबाबत अधिक माहिती असेल. मी एक संपादक आहे. महाराष्ट्रातील मी सर्वात ज्येष्ठ संपादक आहे. मी पत्रकार आणि वार्ताहर सुद्धा आहे.
माझी इच्छा झाली तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला जाईल. मात्र, या पत्रकार परिषदेमध्ये मला अडवायचा प्रयत्न होईल आणि मला गोंधळ नकोय.”
या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात न करता पंचतारांकित हॉटेलमध्ये ठोकला होता. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर सडकवून टीका केली होती.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मुक्काम पंचतारांकित हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात हलवला आहे. यावर प्रतिक्रिया देत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकेचा टीका घेतल्यानंतर आपला मुक्काम पंचतारांकित हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात हलवला आहे.
त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्व आमदारांचं अभिनंदन करतो. छत्रपती संभाजीनगरमधील त्यांनी सर्व हॉटेल्स आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. त्या सर्वांचे पेमेंट देखील झालं होतं.”
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती असताना मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचं रूप – जयंत पाटील
- Sanjay Raut | CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेचा पास संजय राऊतांना मिळाला, मात्र…
- Rohit Pawar | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज – रोहित पवार
- Uddhav Thackeray | देव-देवतांची फसवणूक करायला हे सरकार मागे पुढे पाहत नाही; ठाकरे गटाची टीका
- Eknath Shinde | विरोधानंतर CM शिंदेंचा मुक्काम आता पंचतारांकित हॉटेलमधून शासकीय गृहात