Jayant Patil | मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती असताना मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचं रूप – जयंत पाटील

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होणार आहे.

या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपला मुक्काम शासकीय विश्रामगृह ऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये ठोकला होता. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली होती.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मुक्काम पंचतारांकित हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात हलवला असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व घटनानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती असताना मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचं रूप दिलं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलंय त्या पार्श्वभूमीवर आजची राज्यमंत्रीमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे.

Today’s state cabinet meeting is very important – Jayant Patil

पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. पुढची पिढी शेती करणार का? इतका गंभीर प्रश्न आहे.

शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे मराठवाड्यात सर्वात अधिक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारनं गंभीरपणे पहायला हवं.

इतर राज्यात, जिल्ह्यांमध्ये कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत इथल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. छत्रपती संभाजीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी आहे. पण विमान येतच नाही.

दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं रूप दिले आहे. अति उत्साहात सरकार सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्याचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.