Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता.
मात्र, नंतरच्या अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्र मागे राहिला आणि गुजरात पुढे गेला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे.
Our government has not taken any decision for personal interest – Eknath Shinde
एकनाथ शिंदे म्हणाले, “जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, नंतरच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र मागे राहिला आणि गुजरात पुढे गेला.
परंतु, आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आला आहे आणि हे मी अभिमानाने सांगतो. आपल्या सरकारने एकही निर्णय वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले, “सरकार आपल्या पाठीशी कायम आहे. पाऊस पडेल आणि आपला कोटा पूर्ण होईल, असं मला वाटत आहे. त्याचबरोबर सरकारने एनडीआरएफचे नियम मोडून मदत केली आहे.
शासनाने एक रुपयात पीक विमा योजना उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार रुपये देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे.
आपला देश आणि राज्य प्रगतीपथावर आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाचं मन जिंकण्याचं काम केलं आहे.
या गोष्टीचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येईल.”
महत्वाच्या बातम्या
- Aditya Thackeray | मंत्रिमंडळाच्या बैठकीकडून काहीही अपेक्षा नाही – आदित्य ठाकरे
- Sanjay Raut | माझी इच्छा झाली तर मी CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाईल – संजय राऊत
- Jayant Patil | मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती असताना मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचं रूप – जयंत पाटील
- Sanjay Raut | CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेचा पास संजय राऊतांना मिळाला, मात्र…
- Rohit Pawar | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज – रोहित पवार