Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: आज (16 सप्टेंबर) तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात ही बैठक पार पडली.
या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली होती.
त्याचबरोबर संजय राऊत यांना या पत्रकार परिषदेचा पास मिळाला असल्याचं देखील बोललं गेलं होतं. मात्र, संजय राऊत या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “राऊत नाही आले का? तुमचे ते विकास राऊत.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेवर संजय राऊत काय उत्तर देतील? यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
I am an editor – Sanjay Raut
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde) पत्रकार परिषदेला जाणार की नाही? यावर संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांची संवाद साधत असताना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “मी एक संपादक आहे. आपल्या राज्यातील मी सर्वात ज्येष्ठ संपादक आहे. त्याचबरोबर मी एक वार्ताहर आणि पत्रकार देखील आहे.
माझी इच्छा असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला मी जाईल. मात्र, या पत्रकार परिषदेमध्ये मला अडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि मला गोंधळ नकोय.”
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबत आमच्यात कोणताही वाद नव्हता – जयंत पाटील
- Sharad Pawar | शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी; शरद पवार गटाची टीका
- Nana Patole | आताचं सरकार फक्त घोषणा करणारं आणि अधोगतीकडे नेणारं – नाना पटोले
- Eknath Shinde | उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र मागे राहिला अन् गुजरात पुढे गेला – एकनाथ शिंदे
- Aditya Thackeray | मंत्रिमंडळाच्या बैठकीकडून काहीही अपेक्षा नाही – आदित्य ठाकरे