🕒 1 min read
Jayant Patil | पुणे: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालक झाली होती. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून राज्य सरकारमध्ये सामील झाले होते.
अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. यानंतर अजित पवार गटानं राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.
यानंतर दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबत आमच्यात कोणताही वाद नव्हता, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
We will take further action after consulting lawyers – Jayant Patil
जयंत पाटील म्हणाले, “अजित पवार गट आणि आमच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावरून आणि चिन्हावरून कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता.
मात्र, आमचं म्हणणं ऐकून न घेताच निवडणूक आयोगाने घड्याळ या चिन्हाबाबत वाद असल्याचं जाहीर करून टाकलं आहे. या मुद्द्यावर आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन पुढील कारवाई करणार आहोत.”
दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीवर जयंत पाटील यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, ”
“मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलंय त्या पार्श्वभूमीवर आजची राज्यमंत्रीमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे.
पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. पुढची पिढी शेती करणार का? इतका गंभीर प्रश्न आहे.
शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे मराठवाड्यात सर्वात अधिक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारनं गंभीरपणे पहायला हवं.
इतर राज्यात, जिल्ह्यांमध्ये कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत इथल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. छत्रपती संभाजीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी आहे. पण विमान येतच नाही.
दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं रूप दिले आहे. अति उत्साहात सरकार सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्याचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो.”
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी; शरद पवार गटाची टीका
- Nana Patole | आताचं सरकार फक्त घोषणा करणारं आणि अधोगतीकडे नेणारं – नाना पटोले
- Eknath Shinde | उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र मागे राहिला अन् गुजरात पुढे गेला – एकनाथ शिंदे
- Aditya Thackeray | मंत्रिमंडळाच्या बैठकीकडून काहीही अपेक्षा नाही – आदित्य ठाकरे
- Sanjay Raut | माझी इच्छा झाली तर मी CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाईल – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











