Shinde Group | ठाणे: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
उपोषण मागे घेतलं असलं तरी जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.
ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रात दंगे घडवण्याचं प्लॅनिंग करत असल्याचं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. मस्के यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
In Thane, the Maratha activists were going to protest peacefully – Shinde Group
नरेश मस्के म्हणाले, “मराठा क्रांती मोर्चाने ठाण्यात बंदचे आवाहन केले होते. ठाण्यामध्ये ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार होते. त्यांना आंदोलन करण्यासाठी कोणीच विरोध केला नव्हता.
मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाण्यात आणि महाराष्ट्र दंगे कसे होतील, त्याचबरोबर हे मराठा मोर्चा तीव्र कसे होतील, याचं प्लॅनिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाची काही मंडळी करत आहे.
दोन्ही पक्षांनी त्यांचे शहराध्यक्ष आणि काही नेते प्रत्येक विभागात पाठवले होते. मात्र, मराठा समाजाने आणि नागरिकांनी त्यांना भाव दिला नाही. त्यामुळे ठाण्यातील बंद शांततेत पार पडला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी मोर्चाच्या आदल्या दिवशी लोकांना भडकवण्याचं काम करत होते. मात्र, त्यांच्या सांगण्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही.
मराठा समाजाचा प्रश्न फक्त एकनाथ शिंदे सोडवू शकतात, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाचे महाराष्ट्र पेटवण्याचे सर्व प्लॅन धुळीस मिळाले आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | भाजपची सनातन धर्म विषयाची चिंता पोकळ; ठाकरे गटाची भाजपवर टीका
- Amit Shah | पैशाची नासाडी! अमित शाहांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द
- Eknath Shinde | आम्ही कुठं थांबलोय याची आधी शहानिशा करा; CM शिंदेंनी वडेट्टीवारांना सुनावलं
- Eknath Shinde | आम्ही फक्त घोषणा नाही तर अंमलबजावणी देखील करतो – एकनाथ शिंदे
- Eknath Shinde | राऊत नाही आले का? पत्रकार परिषदेत CM शिंदेंचा मिश्किल सवाल