Amit Shah | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी त्यांचा हा दौरा रद्द केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाह यांच्या कार्यक्रमासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा मंडप बांधला गेला होता. त्यांचा हा दौरा रद्द झाल्यामुळे तीन कोटी रुपयांचा मंडप वाया गेला आहे. अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्यामुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
Three crore rupees spent on Amit Shah’s event pavilion was wasted
अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्यादरम्यान मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार होणार होता. परंतु, त्यांचा हा दौरा रद्द झाल्यामुळे हा सत्कार देखील रद्द झाला आहे.
तर दुसरीकडे अमित शाह यांच्या कार्यक्रमाच्या मंडपासाठी खर्च करण्यात आलेले तीन कोटी रुपये पाण्यात गेले आहे. त्यांनी त्यांचा हा दौरा अचानक रद्द केल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
दरम्यान, दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकाच्या टिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, “आम्ही फक्त घोषणा करून कागदावर ठेवत नाही. तर आमचं सरकार घोषणा झाल्यावर अंमलबजावणी देखील करतं. मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प रखडलेले होते, त्यांना आम्ही मार्गी लावत आहोत.
त्याचबरोबर मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आम्ही काही निर्णय घेतले आहे. मराठवाड्यासाठी 59 कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. तर यामध्ये 14 हजार कोटींच्या नदीत जोड प्रकल्पाचा देखील समावेश आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | आम्ही कुठं थांबलोय याची आधी शहानिशा करा; CM शिंदेंनी वडेट्टीवारांना सुनावलं
- Eknath Shinde | आम्ही फक्त घोषणा नाही तर अंमलबजावणी देखील करतो – एकनाथ शिंदे
- Eknath Shinde | राऊत नाही आले का? पत्रकार परिषदेत CM शिंदेंचा मिश्किल सवाल
- Jayant Patil | राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबत आमच्यात कोणताही वाद नव्हता – जयंत पाटील
- Sharad Pawar | शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी; शरद पवार गटाची टीका