Maratha Reservation | कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सध्या चांगलं तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
अशात सकल मराठा समाज सरकार विरोधात आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, कंत्राटीकरण आणि खाजगीकरण रद्द करा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आली आहे.
यासाठी महात्मा गांधीजी यांच्या जयंतीदिनी मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष संजय साखोळे व संभाजी ब्रिगेडचे विकास जाधव एकदिवसीय उपोषण करतील, अशी माहिती मिळाली आहे.
A meeting of the entire Maratha community was held on the issue of Maratha reservation
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. नोकरीची हमी देणारे आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर सरकारी नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात लाभ कसा मिळणार, हा विचार सरकार करत नाही. त्याचबरोबर सरकार मराठ्यांच्या मुलांचं भवितव्य संपुष्टात आणत आहे.
आगामी निवडणुकांमध्ये लाभ मिळावा म्हणून मराठा आरक्षणाची घोषणा केली जाईल. मात्र त्याचा फायदा मराठा समाजाला मिळू नये, यासाठी सरकारने खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करणारी धोरणे आणले आहेत.
त्यामुळे सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाला विरोध व्हायला हवा, तरच मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होईल, असं या बैठकीत सांगण्यात आहे.”
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” “शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून हिमायतनगर, जि. नांदेड येथील एका तरुणाने आत्महत्या केली. हि घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे.
राज्य आणि केंद्र सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळण्यात सपशेल अपयश आले आहे. तरुणांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.
हि अतिशय धोकादायक बाब आहे. माझे तरुणांना आवाहन आहे की, कृपया आपण कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या उर्जेची समाजाला गरज आहे. या तरुणास भावपूर्ण श्रद्धांजली.”
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | केंद्र सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात अपयश – सुप्रिया सुळे
- Narendra Modi | ऐतिहासिक निर्णयांचं हे विशेष सत्र; संसदेच्या विशेष अधिवेशनावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
- Prithviraj Chavan | मोदी पुन्हा निवडून आले तर देशात रशियासारखी हुकूमशाही येईल – पृथ्वीराज चव्हाण
- Sanjay Raut | ठाकरे गट नाही, शिवसेना म्हणा; संजय राऊत संतापले
- Eknath Shinde | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही – एकनाथ शिंदे