Narendra Modi | नवी दिल्ली: आज (18 सप्टेंबर) पासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. हे विशेष अधिवेशन 22 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
या विशेष सत्रामध्ये ऐतिहासिक निर्णय होणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.
This special session of Parliament is very short – Narendra Modi
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, “संसदेचं हे विशेष अधिवेशन अत्यंत छोटं आहे. मात्र, भविष्याच्या दृष्टीने या अधिवेशनात मोठे आणि ऐतिहासिक निर्णय होणार आहे.
सर्व आमदार आणि खासदारांना जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणासह जास्तीत जास्त वेळ मिळावा. सर्व जुन्या गोष्टींना मागे टाकून आम्ही नवीन संसद भवनात काही नवीन गोष्टी घेऊन येऊ, असा मला विश्वास आहे.”
उद्या गणरायाचे आगमन होणार आहे. यावेळी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गणेश चतुर्थीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “श्री गणपती हे विघ्न दूर करणारे देवता मानले जातात.
त्यामुळे भारताच्या विकासाच्या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होणार नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी निघालेल्या प्रस्तावामध्ये नव्या भारताची स्वप्न साकार होतील. 19 सप्टेंबर पासून म्हणजेच गणेश चतुर्थी पासून नवीन संसद भवनात कामकाज सुरू होणार आहे.”
यावेळी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चांद्रयान 3 मोहिमेवर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “जेव्हा अशा प्रकारच्या मोहीम यशस्वीरित्या पार पडतात तेव्हा अनेक शक्यता उघडतात.
चांद्रयान तीन मोहिमेदरम्यान माझ्यासोबत पीएमओ मंत्री जितेंद्र सिंग आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी हे देखील होते.”
महत्वाच्या बातम्या
- Prithviraj Chavan | मोदी पुन्हा निवडून आले तर देशात रशियासारखी हुकूमशाही येईल – पृथ्वीराज चव्हाण
- Sanjay Raut | ठाकरे गट नाही, शिवसेना म्हणा; संजय राऊत संतापले
- Eknath Shinde | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही – एकनाथ शिंदे
- Shinde Group | ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाडांकडून महाराष्ट्रात दंगे घडवण्याचं प्लॅनिंग; शिंदे गटातील नेत्याचा आरोप
- Uddhav Thackeray | भाजपची सनातन धर्म विषयाची चिंता पोकळ; ठाकरे गटाची भाजपवर टीका