Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे.
हे आंदोलन सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत धक्कादायक माहिती दिली आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून हिमायतनगर, जि. नांदेड येथील एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दिली आहे. या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येणार आहे.
Maratha reservation is not available due to government’s refusal
ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून हिमायतनगर, जि. नांदेड येथील एका तरुणाने आत्महत्या केली. हि घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे.
राज्य आणि केंद्र सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळण्यात सपशेल अपयश आले आहे. तरुणांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.
हि अतिशय धोकादायक बाब आहे. माझे तरुणांना आवाहन आहे की, कृपया आपण कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या उर्जेची समाजाला गरज आहे. या तरुणास भावपूर्ण श्रद्धांजली.”
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी समोर आली होती. यानंतर ओबीसी समाजाने देखील आंदोलन करायला सुरू केली होती.
त्यानंतर ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी होणार, नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील मोठं विधान केलं आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi | ऐतिहासिक निर्णयांचं हे विशेष सत्र; संसदेच्या विशेष अधिवेशनावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
- Prithviraj Chavan | मोदी पुन्हा निवडून आले तर देशात रशियासारखी हुकूमशाही येईल – पृथ्वीराज चव्हाण
- Sanjay Raut | ठाकरे गट नाही, शिवसेना म्हणा; संजय राऊत संतापले
- Eknath Shinde | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही – एकनाथ शिंदे
- Shinde Group | ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाडांकडून महाराष्ट्रात दंगे घडवण्याचं प्लॅनिंग; शिंदे गटातील नेत्याचा आरोप