Maratha OBC Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. एका बाजूला अनुसूचित जाती (SC) प्रवर्गांतर्गत उप-वर्गीकरणाची मागणी होत आहे, तर दुसरीकडे मराठा-ओबीसी (Maratha-OBC) आरक्षणावरून तणाव वाढला आहे.
मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. मात्र, त्याआधीच ओबीसी कार्यकर्त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. परिणामी, आंदोलनाच्या ठिकाणावरून आता हे दोन गट आमनेसामने आले आहेत.
Maratha-OBC reservation protest
ओबीसी समाजाने २८ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी १२ ऑगस्ट रोजी आझाद मैदान पोलीस ठाणे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केला. नियमांनुसार, ज्यांनी आधी अर्ज केला आहे, त्या ओबीसींच्या आंदोलनालाच प्राधान्य दिले जावे, असा आग्रह ससाणे यांनी धरला आहे.
ॲडव्होकेट मंगेश ससाणे म्हणाले, “आम्ही कायद्यानुसार आणि वेळेआधीच अर्ज दाखल केला आहे. मनोज जरांगेंचे वरातीमागून घोडे चालणार नाही. आता प्रशासनाने अर्जाची तारीख आणि नोंदणीचा क्रम लक्षात घ्यावा. त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा’. ओबीसी, व्हिजेएनटी, अलुतेदार, बलुतेदार समाजासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाची पुढील रणनीती आणि नियोजनाबाबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाईल. त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल.”
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गांतर्गत कुणबी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, ओबीसी संघटनांनी आझाद मैदानाच्या वापरासाठी आधीच अर्ज केल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकाच कालावधीसाठी आणि एकाच ठिकाणासाठी दोन्ही गटांनी दावा केला आहे. त्यामुळे, पोलीस प्रशासन कोणाला परवानगी देते आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती कशी हाताळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मेट्रो-13 साठी 17,724 कोटी मंजूर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
- नसरापूरनंतर जुन्नर हादरलं; 10 वर्षीय मुलीची हत्या, संशयित आरोपी ताब्यात
- DA Hike Maharashtra: सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 60% झाला; ऑगस्टच्या पगारासोबत थकबाकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











