Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: निती आयोगाच्या धरतीवर राज्य सरकारने मित्र या संस्थेची स्थापना केली आहे. राज्य शासनाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जागा कमी पडल्यामुळे हे कार्यालय निर्मल भवन या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर विधान सभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकार महिन्याला तब्बल २१ लाख रुपये म्हणजे वर्षाला २ कोटी ५६ लाख रुपय भाडे देणार असून ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
CM’s extravagance of crores for “friends” – Vijay Wadettiwar
ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “”मित्रा”साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी. मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकार महिन्याला तब्बल २१ लाख रुपये म्हणजे वर्षाला २ कोटी ५६ लाख रुपय भाडे देणार असून ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे.
राज्याच्या विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र‘ संस्थेचे कार्यालय नरिमन पॉइंट येथील निर्मल भवन या इमारतीमध्ये स्थानांतरित केले आहे.
मंत्रालयासमोर असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत जागा कमी पडत असल्याचे कारण पुढे करत सरकारने हा निर्णय घेतला. मित्र संस्थेवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्राची वर्णी लावली असून आता या मित्राला बसण्यासाठी कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून देऊन ऐसपैस कार्यालयही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी तिजोरीतून पैसे ओरबडण्यासाठी महायुती सरकारची ही एक आणखी नवीन स्कीम आहे. खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेश विकास करणे हा ‘मित्र’च्या स्थापनेमागील उद्देश होता. मात्र खाजगी क्षेत्रात असलेल्या आपल्या मित्र परिवारातील लोकांवर सरकारी तिजोरीतून उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण द्या, खाजगीकरण रद्द करा – सकल मराठा समाज
- Supriya Sule | केंद्र सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात अपयश – सुप्रिया सुळे
- Narendra Modi | ऐतिहासिक निर्णयांचं हे विशेष सत्र; संसदेच्या विशेष अधिवेशनावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
- Prithviraj Chavan | मोदी पुन्हा निवडून आले तर देशात रशियासारखी हुकूमशाही येईल – पृथ्वीराज चव्हाण
- Sanjay Raut | ठाकरे गट नाही, शिवसेना म्हणा; संजय राऊत संतापले