Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही महिन्यांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना सोडून शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे.
राज्य सरकारमध्ये सामील होताच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सत्तेत सामील झाल्यानंतरही भाजप नेते अजित पवारांवर टीका करताना दिसले आहे.
अशात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अजित पवार यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
पडळकर यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गोपीचंद पडळकर अजित दादांबद्दल लायकीच्या बाहेर जाऊन बोलले असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Gopichand Padalkar has spoken beyond his worth – Amol Mitkari
ट्विट परत अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “सन्मा.उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी स्वतःला समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्या व घरात आणि समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला.
उपमुख्यमंत्री अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल.”
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. मात्र, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवलं नाही.
अजित पवारांना पत्र का पाठवले नाही? याचं स्पष्टीकरण देत असताना गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर घनाघाती टीका केली आहे.
ते म्हणाले, “अजित पवार यांच्या विषयी आमची भावना स्वच्छ नाही, त्यामुळे आम्ही त्यांना पत्र दिलं नाही. अजित पवार लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू आहे.
त्यांना आम्ही मानत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र दिलं नाही आणि यापुढे देखील देणार नाही. ज्यांच्याकडून न्याय मिळू शकतो, त्या दोघांना मी पत्र पाठवलं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Gopichand Padalkar | सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक – गोपीचंद पडळकर
- Ambadas Danve | मोदींची हुजरेगिरी करण्यासाठी शिंदेंनी योजना घोषित केल्या – अंबादास दानवे
- Vijay Wadettiwar | अजित पवारांनी तरुणांना उध्वस्त करण्याचे पाप तरी करू नये – विजय वडेट्टीवार
- Vijay Wadettiwar | “मित्रा”साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण द्या, खाजगीकरण रद्द करा – सकल मराठा समाज