Gopichand Padalkar | पुणे: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. अशात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक असं पडळकर यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या त्या वक्तव्यावर बोलत असताना गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, “ही लबाड लांडग्याची लेक बोलत आहे. त्यावर तुम्हाला फार लक्ष देण्याची गरज नाही.
तुमच्या पालख्या आतापर्यंत आमच्या समाजाने वागवल्या आहे. हे करत असताना लोकांच्या चपला फाटल्या. तुमच्या बापाने, तुमच्या भावाने, तुमच्या पुतण्याने तिकडं बघितलं नाही.
त्यामुळे तुम्ही देखील जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आता आमचे सगळे लोकं हुशार झाले आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे काय बोलल्या याला आम्ही गाडीची किंमत देत नाही.
Our feelings about Ajit Pawar are not clean – Gopichand Padalkar
यावेळी बोलत असताना गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर देखील टीकास्त्र चालवलं आहे.
ते म्हणाले, “अजित पवार यांच्या विषयी आमची भावना स्वच्छ नाही, त्यामुळे आम्ही त्यांना पत्र दिलं नाही. अजित पवार लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू आहे.
त्यांना आम्ही मानत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र दिलं नाही आणि यापुढे देखील देणार नाही. ज्यांच्याकडून न्याय मिळू शकतो, त्या दोघांना मी पत्र पाठवलं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danve | मोदींची हुजरेगिरी करण्यासाठी शिंदेंनी योजना घोषित केल्या – अंबादास दानवे
- Vijay Wadettiwar | अजित पवारांनी तरुणांना उध्वस्त करण्याचे पाप तरी करू नये – विजय वडेट्टीवार
- Vijay Wadettiwar | “मित्रा”साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण द्या, खाजगीकरण रद्द करा – सकल मराठा समाज
- Supriya Sule | केंद्र सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात अपयश – सुप्रिया सुळे