Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ‘नमो’ अभियानाची घोषणा केली आहे.
या अंतर्गत राज्यात अकरा कलमी कार्यक्रम राबवण्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. नरेंद्र मोदींची हुजरेगिरी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी या योजना घोषित केल्या असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
In fact, these schemes have been implemented for the past several years – Ambadas Danve
अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “पूर्वी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आणि पंतप्रधान कौशल्य विकास योजना या नावाने या योजना सुरू होत्या. यामध्ये आता फक्त 73 आकडा वापरून नव्याने घोषणा केली आहे.
तर 73 हजार बांधकाम कामगाराबाबतची केलेली घोषणा 2019 पासून इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत सुरक्षा संच उपलब्ध करून देण्यात येत होते.
त्याचबरोबर नमो शेततळे योजना ही राज्यात याआधी मागेल त्याला शेततळे योजना म्हणून ओळखली जात होती. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीं समोर हुजरेगिरी करण्यासाठी आणि आम्ही काहीतरी वेगळं करत आहोत हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव बदलून या योजना घोषित केल्या आहे. पण प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षापासून या योजना राबवल्या गेलेल्या आहे.
पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “देशामध्ये जेव्हा युपीएचं सरकार होतं, तेव्हा गांधी घराण्यातील लोकांच्या नावावरून वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या होत्या.
मात्र, त्या योजनेच्या नावांवर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला होता. जर त्या काळामध्ये शासकीय योजनांना व्यक्तीचं नाव देणं योग्य नव्हतं, तर हाच नियम भारतीय जनता पक्षाला देखील लागू झाला पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | अजित पवारांनी तरुणांना उध्वस्त करण्याचे पाप तरी करू नये – विजय वडेट्टीवार
- Vijay Wadettiwar | “मित्रा”साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण द्या, खाजगीकरण रद्द करा – सकल मराठा समाज
- Supriya Sule | केंद्र सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात अपयश – सुप्रिया सुळे
- Narendra Modi | ऐतिहासिक निर्णयांचं हे विशेष सत्र; संसदेच्या विशेष अधिवेशनावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया