Bacchu Kadu | गणपतीपुढे जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला पाठवणार – बच्चू कडू

Bacchu Kadu | सोलापूर: सध्या राज्यामध्ये आनंदात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी या गावात मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन गणपती मंडळाची स्थापना केली आहे.

या मंडळातील गणपतीची पूजा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते पार पडली. यानंतर प्रसार माध्यमाशी संवाद साधत असताना आमदार बच्चू कडू यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यावर निशाणा साधला आहे. गणपतीपुढे जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला पाठवणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Sachin Tendulkar should not advertise online games – Bacchu Kadu

सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात करणं महागात पडणार असल्याचं चिन्ह दिसत आहे. कारण ऑनलाईन गेम वरून बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी तेंडुलकर यांना धारेवर धरलं आहे.

सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमची जाहिरात करू नये, असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी तेंडुलकर यांच्यावर या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.

बच्चू कडू म्हणाले, “राज्यामध्ये प्रहार संघटनेचे जितके गणेश मंडळ आहे, तिथे दानपेटी ठेवल्या जातील. यात जमा होणारे पैसे विसर्जन झाल्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्या घरी पोहोचवू.

जंगली रमीची जाहिरात करणाऱ्या महान खेळाडूला हे पैसे पाठवणार.” बच्चू कडू यांनी स्वतः पेटीत 100 रुपये टाकले.

यावेळी बोलत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अकोलेकाटी या गावातील लोकांचा तोंड भरून कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “राज्यामध्ये एकीकडे दंगलीचं वातावरण निर्माण झालं असताना अकोलेकाटी गावात मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन गणपती मंडळाची स्थापना केली आहे.

त्यांनी अतिशय धाडसाचं आणि कौतुकाचं काम केलं आहे. या गावाची लोकसंख्या 5000 असली तरी सर्वजण गुण्यागोविंदाने राहत आहे. सर्व एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरा करत आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.