Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदारांची राजकीय तिरडी बांधलीये – संजय राऊत
Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) शिंदे गट प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना येत्या दोन-तीन दिवसांमध्ये नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या माहितीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदारांची राजकीय तिरडी बांधली आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
Rahul Narwekar has to make a decision – Sanjay Raut
आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार अपात्र ठरतील. याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याचं काहीच कारण नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांची राजकीय तिरडी बांधली आहे. आता फक्त हे राम म्हणायचं बाकी आहे. हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगत आहे.
विज्ञान आणि कायदा याला मर्यादा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यावा लागेल. नाही तर संसदेच्या इतिहासामध्ये विधानसभा अध्यक्षांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल.”
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदार अपात्रतेबाबत आपली माजू मांडावी लागणार आहे. यासाठी दोन्ही गटातील प्रमुखांना राहुल नार्वेकर लवकरच नोटीस बजावणार आहे.
येत्या महिनाभरात राहुल नार्वेकर ही नोटीस पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या माहितीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील आमदारांच्या चिंतेत भर पडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलय – विजय वडेट्टीवार
- Vijay Wadettiwar | सत्तेत असणाऱ्या तीनही पक्षांचं लक्ष फक्त सरकारी तिजोरीकडे – विजय वडेट्टीवार
- Bacchu Kadu | गणपतीपुढे जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला पाठवणार – बच्चू कडू
- Eknath Shinde | शिंदेंचे आमदार अपात्र ठरणार? उद्धव ठाकरे आणि शिंदेंना विधानसभा अध्यक्ष पाठवणार नोटीस
- Uddhav Thackeray | निवडणुकांकडे लक्ष ठेवून मोदींनी महिलांना राजकीय हक्क देण्याचा डाव टाकलाय; ठाकरे गटाची टीका