🕒 1 min read
Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र, तरीही राज्य सरकारने अद्याप दुष्काळ जाहीर केलेला नाही.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे याची माहिती सरकारला आहे की नाही हा प्रश्न आहे. गेल्या अडीच महिन्यांमध्ये राज्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
A major crisis of drought may come to Maharashtra – Vijay Wadettiwar
ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे याची माहिती सरकारला आहे की नाही हा प्रश्न आहे.
गेल्या अडीच महिन्यांमध्ये राज्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात दुष्काळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ शकतं ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यातील खालील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
#अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 45 टक्के कमी पाऊस झालाय.
#सांगली तही सरासरी 45 टक्के कमी पाऊस.
#नांदेड मध्ये सरासरीच्या 19 टक्के कमी.
#सोलापुर सरासरीच्या 35 टक्के कमी.
#सातारा सरासरीच्या 40 टक्के कमी
#छत्रपती_संभाजीनगर सरासरी 27 टक्के कमी.
#जालना सरासरीच्या 43 टक्के कमी
#बीड मध्ये सरासरीच्या 43 टक्के कमी.
#धाराशिव मध्ये सरासरीच्या 32 टक्के कमी.
#परभणी सरासरीच्या 31 टक्के कमी
#अमरावती सरासरीच्या 30 टक्के कमी.
#वाशिम सरासरीच्या 22 टक्के कमी.
#अकोला सरासरीच्या 29 टक्के कमी पाऊस झालाय.
दुष्काळी संकट आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे अहवाल पुढे आले आहे.
आपल्याला काय ? आपल्याला फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं आहे, हाच पॅटर्न सरकार चालवताना महायुतीने हाती घेतला आहे.”
राज्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या मुद्द्यावरून सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, “ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय! राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलै पर्यंत तब्बल 1555 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या.
अमरावती विभागात 637 शेतकरी आत्महत्या. अमरवती 183, बुलढाणा 173, यवतमाळ 149, अकोला 94, वाशीम 38.
औरंगाबाद विभागात 584 शेतकरी आत्महत्या. बीड 155, उस्मानाबाद 102, नांदेड 99, औरंगाबाद 86, परभणी 51, जालना 36, लातूर 35, हिंगोली 20.
नागपूर विभागात 144 शेतकरी आत्महत्या. चंद्रपूर 73, वर्धा 50, नागपूर 13, भंडारा 05, गोंदिया 03.
नाशिक विभागात 174 शेतकरी आत्महत्या जळगाव 93 अहमदनगर 43 धुळे 28 नाशिक 07 नंदुरबार 03.
पुणे विभागात 16 शेतकरी आत्महत्या. सोलापूर 13, सातारा 02, सांगली 01 (पुणे आणि कोल्हापूर शून्य शेतकरी आत्महत्या).
सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जून महिन्यात. शेतकरी आत्महत्या जानेवारी 226 फेब्रुवारी 192 मार्च 226 एप्रिल 225 मे 224 जून 233 जुलै 229 राज्यातील शेतकरी रोज मरतोय, सरकार दुष्काळ कधी जाहीर करणार ?
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | सत्तेत असणाऱ्या तीनही पक्षांचं लक्ष फक्त सरकारी तिजोरीकडे – विजय वडेट्टीवार
- Bacchu Kadu | गणपतीपुढे जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला पाठवणार – बच्चू कडू
- Eknath Shinde | शिंदेंचे आमदार अपात्र ठरणार? उद्धव ठाकरे आणि शिंदेंना विधानसभा अध्यक्ष पाठवणार नोटीस
- Uddhav Thackeray | निवडणुकांकडे लक्ष ठेवून मोदींनी महिलांना राजकीय हक्क देण्याचा डाव टाकलाय; ठाकरे गटाची टीका
- Eknath Shinde | धनगरांना आरक्षण मिळणार? CM शिंदेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











