Share

Vijay Wadettiwar | सत्तेत असणाऱ्या तीनही पक्षांचं लक्ष फक्त सरकारी तिजोरीकडे – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहे. यानंतर धनगर समाज देखील आरक्षणाची मागणी करत आहे. तर यानंतर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी समोर आली होती. ओबीसी नेत्यांनी या मागणीला विरोध दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहे.

यानंतर धनगर समाज देखील आरक्षणाची मागणी करत आहे. तर यानंतर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी समोर आली होती. ओबीसी नेत्यांनी या मागणीला विरोध दर्शवला होता.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सत्तेत असणाऱ्या तीनही पक्षांचं लक्ष फक्त सरकारी तिजोरीकडे असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

The reservation limit should be increased above 50% – Vijay Wadettiwar 

प्रसार माध्यमांशी बोलत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “आताच्या सरकारने हा आरक्षणाचा मुद्दा पेटवला आहे. त्याचबरोबर 2014 ते 2019 या कालावधीमध्ये देखील हा मुद्दा चर्चेत होता.

त्या सरकारने हा मुद्दा पुढे नेला होता. तेव्हा सरकारने टिकाऊ आरक्षण दिलं नाही. कारण राज्य सरकारला टिकाऊ आरक्षण देण्याचा अधिकार नव्हता.

घटना दुरुस्ती करून टिकाऊ आरक्षण देण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. पण मतांचं राजकारण केलं गेलं आणि भावनेचा देखील खेळ केला गेला. म्हणून मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.”

पुढे बोलताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “50% च्या वर आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे. त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही. मात्र सत्तेत असणाऱ्या तिन्ही पक्षांचं लक्ष फक्त सरकारी तिजोरीवर आहे. जेवढी सरकारी तिजोरी लुटता येईल तेवढी ते लुटून घेणार आहे.

ते धनगर, मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करत आहे. हा एकमेव धंदा या राज्यकर्त्यांनी उचललेला आहे. त्यांचे सगळे घोटाळे आम्ही लवकरच बाहेर काढणार आहोत.

सरकारची लूट करण्याचा या तिन्ही पक्षांनी पद्धतशीर प्लॅन केला आहे. सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी काढलेल्या जीआरची होळी करा, असं मी सर्व तरुणांना आवाहन करेल.

सरकारी नोकऱ्या संपवायचा आणि आरक्षण संपवायचं, हे या सरकारचं षडयंत्र आहे. सत्तेत असलेले तीनही टगे हे सर्व खुलेआम करत आहेत.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही