Chandrashekhar Bawankule | पडळकरांच्या विधानानंतर बावनकुळेंनी मागितली अजित पवारांची माफी, म्हणाले…

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती.

अजित पवारांविषयी आमच्या मनात स्वच्छ भावना नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आम्ही त्यांना मानत नाही, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटातील नेते आक्रमक झाले होते.

याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची माफी मागितली आहे. गोपीचंद पडळकर अजित पवारांबद्दल जे काही बोलले आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांबद्दल केलेलं विधान संस्कृती आणि संस्कृत सोडून आहे.

भारतीय जनता पक्ष अशा प्रकारच्या वक्तव्याला कधीच पाठिंबा दर्शवणार नाही. आम्ही महायुतीमध्ये एकत्र असलो तरी आपले विचार वेगळे असू शकतात.

महायुतीत मतभेद असू शकतात पण वैयक्तिक टीका करून मनभेद निर्माण करणे हे आपल्या संस्कृतीत नाही. त्याचबरोबर हे भाजपच्या संस्कृतीला देखील शोभत नाही.

आपला एखाद्याशी वैर असला तरी पडळकरांसारखं कोणीही बोलू नये. सार्वजनिक कुणी कुणाचा अपमान करू नये, ते आपल्या संस्कृती आणि रक्तात नाही.”

Ajit Pawar should forgive Gopichand Padalkar with a big heart – Chandrashekhar Bawankule

पुढे बोलताना ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “अजित पवारांबद्दल पडळकर जे काही बोलले आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

अजित पवारांनी मोठ्या मनानं गोपीचंद पडळकर यांना माफ करावं. पडळकर यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचं मन दुखावलं आहे. या प्रकरणावर मी स्वतः अजित पवारांसोबत बोलणार आहे. ”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.