Rahul Narwekar | मुंबई: आमदारांच्या अपात्रतेबाबत एका आठवड्यात सुनावणी द्या आणि दोन आठवड्यानंतर काय कारवाई केली? याची सविस्तर माहिती द्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे.
त्यानंतर राहुल नार्वेकर कामाला लागले असल्याची माहिती मिळाली आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये राहुल नार्वेकर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती मिळाली आहे.
याच पार्श्वभूमीवर कायदे तज्ञांशी चर्चा करण्यासाठी राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले असल्याचं बोललं जात आहे. नार्वेकर अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Who will Rahul Narwekar meet in Delhi?
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या चार महिन्यात काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष कामाला लागलेले असून ते दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्लीमध्ये नार्वेकर ज्येष्ठ कायदे तज्ञांची चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे.
कायदे तज्ञांशी बोलून नार्वेकर पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. राहुल नार्वेकर दिल्लीत नक्की कुणाची भेट घेणार? दिल्लीत नक्की काय चर्चा होणार? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार अपात्र ठरणार आहेत. याबाबत कोणाच्याही मनात कोणतीही शंका असण्याचं काहीच कारण नाही.
मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदारांची राजकीय तिरडी बांधली आहे. आता फक्त हे राम म्हणायचं बाकी आहे. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर संसदेच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव काळ्या अक्षरात छापलं जाईल.”
महत्वाच्या बातम्या
- Bacchu Kadu | अनेक महिलांचे पती परमेश्वरच काम बघतात; महिला आरक्षणावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया
- Maratha Reservation | आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद करणार नाही – मनोज जरांगे
- Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदारांची राजकीय तिरडी बांधलीये – संजय राऊत
- Vijay Wadettiwar | ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलय – विजय वडेट्टीवार
- Vijay Wadettiwar | सत्तेत असणाऱ्या तीनही पक्षांचं लक्ष फक्त सरकारी तिजोरीकडे – विजय वडेट्टीवार