Rohit Pawar | भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढा नाही तर राजकारण सोडा; रोहित पवारांची CM शिंदे आणि अजित पवारांवर टीका

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे.

यानंतर दोन्ही गट आमने-सामने अनेकदा आलेले दिसले आहे. अशात आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांसह एकनाथ शिंदे व शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढा नाही तर राजकारण सोडा, असं म्हणत रोहित पवारांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

People are against BJP – Rohit Pawar

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांना भाजपने फक्त लोकसभा निवडणुकांसाठी जवळ केलं आहे.

लोकसभेसाठी लोकांच्या मनातील वातावरण बघितलं तर ते भाजपच्या विरोधातलं आहे. त्याचबरोबर भाजपसोबत गेलेल्या या लोकांना कोणत्याही प्रकारचं जनमत राहिलेलं नाही.

भाजपच्या चिन्हावर लढा नाही तर राजकारण सोडा, असं भारतीय जनता पक्ष या लोकांना लोकसभा निवडणुकानंतर विधानसभा निवडणुकांसाठी म्हणेल.” रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि शरद पवार गटामध्ये नवा वाद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही गटाने आपले प्रदेशाध्यक्ष, व्हीप आणि अध्यक्ष यांच्या नावाची घोषणा केली आहे.

यानंतर अजित पवार गटाने शरद पवार गटाविरोधात विधिमंडळ अध्यक्षांकडे एक याचिका दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. विरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी अजित पवार गटाने विधिमंडळ अध्यक्षांकडे केली आहे. या याचिकेनंतर शरद पवार गटातील नेत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.