Uday Samant | एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी निवडून येतील – उदय सामंत

Uday Samant | टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान देत आपल्यासमोर निवडणुकीत उभं रहा, असं म्हटलं होतं.

आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी निवडून येतील, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde works 18 to 20 hours a day – Uday Samant 

उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काम करत असतात. ते दिवसाला 18 ते 20 तास काम करतात. त्यामुळे जे लोक दिवसातून चार तास काम करतात त्यांनी आम्हाला काही शिकवू नये.

राज्यात 288 मतदार संघ आहे. यामध्ये एकनाथ शिंदे कुठेही उभे राहिले तरी ते बहुमताने निवडून येतील. एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी ते निवडून येतील.”

यावेळी बोलत असताना उदय सामंत (Uday Samant) आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “स्वतःच्या वरळी मतदारसंघाची सध्या काय परिस्थिती आहे?

सिलिंक खाली कोळी बांधव आहे, त्यांचे नेमके काय प्रश्न आहेत? याकडे त्यांना लक्ष देण्याची गरज आहे. वरळीमध्ये घोडा मैदान अत्यंत जवळ आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर देण्याची काहीच गरज नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.