Anil Parab | सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागेल – अनिल परब

Anil Parab | टीम महाराष्ट्र देशा: आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याची माहिती राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिली आहे.

या संदर्भात चर्चा करण्यासाठी नार्वेकर दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत त्यांनी कायदे तज्ञांची चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागेल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

The hearing has not started yet – Anil Parab

अनिल परब (Anil Parab) म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर सुनावणी सुरू होत आहे. मात्र, अद्याप या सुनावणीला सुरुवात झालेली नाही. याबाबतीत फक्त पहिल्या नोटीसा काढण्यात आल्या आहे.

कागदपत्र मिळाले नाही, अशा प्रकारचे कारण सांगून वेळ मारून दिली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्यात सुनावणी घ्यावी लागणार आहे.

त्यानंतर त्यांना पुढच्या संपूर्ण कार्यक्रमाचं वेळापत्रकही द्यावं लागणार आहे. म्हणून आता कोणाचीही सुटका होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागेल.

पुढे बोलताना ते (Anil Parab) म्हणाले, “सर्वसाधारणपणे जो नियम आहे. त्यानुसार सभापती आणि उपसभापती याचिका ऐकतात, असं मी विधान परिषदेच्या भाषणादरम्यान म्हटलं होतं.

सभापती नसेल तर उपसभापती अपात्रतेसंदर्भातील याचिका ऐकतात. मात्र, उपसभापतींवरच अपात्रतेची याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळे ही याचिका आता कोण ऐकणार?

आमदार अपात्रतेबाबतीत ज्येष्ठ सदस्यांची नियुक्ती करून त्याच्याकडे हे प्रकरण सोपवलं जाईल, असं सरकारने त्यावेळी ऑन रेकॉर्ड म्हटलं होतं. मात्र आजपर्यंत त्या सदस्याची नियुक्ती झालेली नाही. त्याचबरोबर एकही याचिका ऐकलेली नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.