Share

Sanjay Raut | निर्णय घेण्यासाठी नार्वेकरांना भाजप कार्यालयात जावं लागतं – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: आमदार अपात्रेसंदर्भात येत्या दोन आठवड्यात सुनावणी घेऊन माहिती देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना दिले आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष गुरुवारी अचानक दिल्लीला रवाना झाले. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी नार्वेकरांना भाजप … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: आमदार अपात्रेसंदर्भात येत्या दोन आठवड्यात सुनावणी घेऊन माहिती देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना दिले आहे.

यानंतर विधानसभा अध्यक्ष गुरुवारी अचानक दिल्लीला रवाना झाले. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी नार्वेकरांना भाजप कार्यालयात जावं लागतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Rahul Narwekar does not respect Supreme Court – Sanjay Raut

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी दिल्लीत भाजप कार्यालयात जावं लागतं.

यानंतर आमच्या मनात ज्या शंका आहे, त्यांना बळ मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी हा घटनात्मक पेच वाढवून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि निर्णय स्पष्ट असताना त्यांनी हा वेळ काढूपणा केला आहे.

आठ दिवसात या कारवाईला सुरुवात करा, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तरी देखील त्यांनी याबाबत कारवाई सुरू केली नसेल तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रात मान मिळत नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करत नाही. बघूया पुढे काय होतं ते?

काल राज्याच्या आरोग्य खात्याची जाहिरात देशातील प्रमुख वृत्तपत्रात देण्यात आली आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “ही फक्त पैशाची उधळपट्टी आहे. आरोग्य खात्याने नेमके काय दिवे लावले आहे? महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने कोरोना काळात जे काम केलं, ते आदर्श काम होतं.

त्या काळात केलेल्या कामाची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. उदय सामंत यांचं जर खरच मन मोठं असेल तर त्या काळात केलेल्या कामाची ते जाहिरात देतील.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही