Jayant Patil | देश अमृतकाळ साजरा करतोय अन् शेतकरी विष पिऊन मरतोय – जयंत पाटील

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये यावर्षी पुरेसा पाऊस पडलेला नाही. यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात त्वरित दुष्काळ घोषित करा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

मात्र, अद्याप राज्य सरकारने दुष्काळ घोषित केलेला नाही. अशात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देश अमृतकाळ साजरा करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र विष पिऊन आत्महत्या करत आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. कर्ज काढून पिक लावणी केली.

मात्र अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेली. हाता तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले, हे सरकारचे खरे अपयश आहे.”

The government should help the farmers with a generous hand – Jayant Patil 

पुढे ते (Jayant Patil) म्हणाले, “गेल्या नऊ महिन्यांमध्ये विदर्भात १ हजार ५८४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याची बाबा समोर आली आहे. गेल्या २५ वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे.

देश अमृतकाळ साजरा करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र विष पिऊन आत्महत्या करत आहे. ही धोक्याची घंटा सरकारने ओळखावी आणि शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करावी.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.