Share

Eknath Shinde – Sharad Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार आज एकाच व्यासपीठावर

🕒 1 min read Eknath Shinde – Sharad Pawar | पुणे : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे गटामध्ये कलगीतुरा रंगलेला असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये देखील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शरद पवार (Sharad Pawar) आज एकाच व्यासपीठावर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde – Sharad Pawar | पुणे : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे गटामध्ये कलगीतुरा रंगलेला असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये देखील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शरद पवार (Sharad Pawar) आज एकाच व्यासपीठावर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. पुण्यातील मांजरी येथे हा कार्यक्रम पार पडत आहे.

अजित पवार, (Ajit Pawar) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि जयंत पाटीलही उपस्थित आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत दोघे नेते एकत्र आले असल्याने ते काय बोलणार,? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या