Chandrashekhar Bawankule | “तुमच्या रक्तात बेईमानी आहे, बेईमानी करतच तुम्ही…”; बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Chandrashekhar Bawankule | मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्ष कोणाचा त्याचबरोबर निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचं? या मुद्द्यावरुन काल जवळपास साडेतीन तासांपासून निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला.

दोन्ही गटांनी ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्ष चिन्हावर दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगासमोरील युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला असला तरी मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचा संभ्रम कायम आहे. सोमवारी 30 जानेवारी रोजी याबाबत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

धनुष्यबाण कोणाला मिळणार याचा निर्णय 30 जानेवारी रोजी निर्णय होणार असून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वांनी विश्वास ठेवावा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी सत्याचा विजय होईल असे म्हटले होते, त्यावरही बानवकुळे यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “१२ कोटी जनतेने सत्याचा विजय पाहिला आहे. तुमच्या रक्तात बेईमानी आहे आणि बेईमानी करत तुम्ही राज्य मिळवलं. पण खरं सत्य काय हे निवडणूक आयोगाचा निकाल आल्यावर स्पष्ट होईल.”

जर निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात प्रकरण सुरू असताना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करत असेल तर निवडणूक आयोग ठरवेल आणि आयोग जो निर्णय देईल तो मान्य करावा. असे असताना आदित्य ठाकरे यांना एवढी घाई का?, असा सवाल करत बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

दरम्यान, दोन्ही गटांनी लेखी उत्तर दाखल केल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. त्याबरोबर 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे मूळ शिवसेना नेमकी कुणाची? हा पेच आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.