Uddhav Thackeray Shivsena | शिवसेना कोणाची संभ्रम कायम; उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं काय?

Shivsena | मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्ष कोणाचा त्याचबरोबर निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचं? या बाबत ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या वकिलांचा आजचा युक्तिवादही संपला आहे. मात्र निवडणूक आयोगाने (Election Commission) यासंदर्भात आता लेखी उत्तर मागितले आणि सुनावणीची पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण नेमकं कोणाचं हा संभ्रम कायम असतानाच ठाकरे गटासमोर आता उद्धव ठाकरेंच्या पक्ष प्रमुख पदाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा याबाबतची पुढील सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत 23 जानेवारीला संपते आहे. पक्षांतर्गत प्रक्रियेसाठी संमती द्या किंवा मुदतवाढ द्या, असे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सांगितले होते. मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे 23 जानेवारीला मुदत संपल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं नेमके काय होणार हे पाहणं आता सर्वांसाठीच औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगात आज शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्हावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. जवळपास 1 तास 10 मिनिटे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.

महत्वाच्या बातम्या