Chitra Wagh | “जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच”; बृजभूषण प्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Chitra Wagh | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करुन महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले भाजपचे खासदार आणि रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर बुधवारी 18 (जानेवारी) कुस्तीपटूंनी हुकूमशाहीचे आरोप लावत बृजभूषण सिंह याला पदावरुन दूर करण्याी मागणी केली जात आहे.

कुस्ती महासंघ आमच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करतो. आम्हाला छळण्याचा प्रयत्न केला जातो. आमचे शोषण केले जात आहे, असा आरोप कुस्तीपटू विनेश फोगाट हिने केला आहे. विनेशाने महिलांचे शोषन केल्याच्या आरोपवर भाजपच्या नेत्या महिलांवर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या चित्रा वाघ गप्प का असा सवाल अनेकांनी केला. त्यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः या विषयात लक्ष घातले आहे. माझ्या माहितीप्रमाणे आजच सकाळी त्यांनी चर्चा करून संपूर्ण माहिती घेतली आहे. माझ्या गप्प राहण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही जेव्हा स्वतः वरिष्ठ नेते त्यात लक्ष घालताहेत तेव्हा सखोल चौकशी होणारच”, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

“या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणारच. देशात मोदीजींचे सरकार आहे येथे सर्वांना न्याय मिळणार म्हणजे मिळणारच”, असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

“आम्ही जेव्हा ऑलिम्पिकसाठी बाहेर गेलो तेव्हा आम्हाला फिजियो कोच दिला गेला नाही. जेव्हा आम्ही याविरोधात आवाज उचलतो, तेव्हा आम्हाला धमकी देवून शांत केले जाते”, असेही विनेश फोगाट म्हणाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button