Anil Desai | “त्यांनीच सांगितल ते मोदींचा माणूस आहेत, मग शिवसेना कुणाची याचा निकाल स्पष्ट”

Anil Desai | मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा मुद्दा निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणीतच अडकून पडला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बाजू मांडली जाणार आहे.

कपिल सिब्बल (Kapil Sibbal) हे ठाकरे गटाचे वकील असून ते ठाकरे गटाकडून युक्तिवाद करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी आजच्या सुनावणीत कोणते मुद्दे मांडले जाणार असल्याचे सांगितले आहे.

“आमची तयारी पूर्ण झाली आहे. कपिल सिब्बल हे आमच्या वतीने बाजू मांडतील यावर आमचे एकच म्हणणे आहे योग्य न्याय हवा आहे. पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत नीट न्याय व्हावा. पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणी यावर निर्णय व्हावा असे दोन अर्ज निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय द्यावा”, असे अनिल देसाई म्हणाले आहेत.

“त्यांनीच सांगितल ते मोदींचा माणूस आहेत, मग शिवसेना कुणाची याचा निकाल स्पष्ट. मी कुणाचा माणूस आहे? हे जर त्यांनी सांगितले आहे तर त्यांना राजकीय संदर्भ द्यायचा होता आणि ते कुणाचे होते हे समोर आले आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयात हे मुद्दे येतील असं वाटतंय. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयात अनेक संदर्भ असतात तसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा संदर्भ निकालात येईल” असेही अनिल देसाई यांनी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :