Deepak Sawant | मोठी बातमी! माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या गाडीला अपघात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Deepak Sawant | मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून वर्तुळात अनेक प्रकरणांमुळे खळबळ उडाली आहे. त्यातीलच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आमदारांच्या गाड्यांना होणाऱ्या अपघातांची मालिका. राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत (Deepak Sawant) यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

यामध्ये माजी मंत्री डॉ. दीपक सावंत (Deepak Sawant) यांच्या मानेला व पाठीला इजा झाली असून त्यांच्यावर अंधेरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. घोडबंदर येथून पालघरच्या दिशेने प्रवास करत असताना माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

डंपरने गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. डंपर चालकाला काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून सावंत हे स्वतःच रुग्णवाहिकेने मुंबई येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. पालघरच्या मोखाद्यात कुपोषित मुलांच्या झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यासाठी दीपक सावंत जात होते.

दरम्यान, सकाळी साडेअकराच्या सुमारास घोडबंदर येथील सगनाई नाका येथे पोहचले असताना त्यांच्या गाडीला एका डंपरने मागून धडक दिली. पाठीमागील बाजूने धडक दिल्यानं घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेतील दोन्ही वाहनांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली आहे

महत्वाच्या बातम्या :