Sajay Raut | “देशात काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊच शकत नाही”- संजय राऊत

Sajay Raut | जम्मू : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. विरोधी पक्षांकडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आरोप होत आहेत. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे जम्मूत आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत हे जम्मूला आले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

‘देशात काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊच शकत नाही’, असेही संजय राऊत Sajay Raut यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुनावले आहे.

“एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल तर भारत जोडो यात्रेची चांगली वातावरण निर्मिती आहे. पक्ष म्हणून नाही पण देशात चांगला संदेश जात आहे. पठाणकोटला हजारो तरुण मशाली घेऊन निघाले होते. मशाली काय काँग्रेसचे चिन्ह नाही. ते शिवसेनेचे चिन्ह आहे. मलाही भरून आले. देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागते. यात्रा जरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात असली तरी सर्वत्र काल संध्याकाळनंतर हजारो मशाली पेटलेल्या दिसल्या. पाऊस असला तरी आम्ही त्या यात्रेत सहभागी होतोय”, असे संजय राऊत  Sajay Raut म्हणाले आहेत.

शिंदे गटाच्या नेत्यांनी राऊत यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता. त्याचाही राऊतांनी समाचार घेतला आहे. “जम्मूवरही पाकिस्तानचे तोफगोळे पडत असतात. अतिरेक्यांचे हल्ले होत असतात. इकडे या म्हणजे कळेल. तिकडे बसून बोलणे ठिक आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.