Share

BJP | “प्रेम ब्रिम काही नसतं, फक्त अपोझिट सेक्सचं आकर्षण असतं”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

🕒 1 min read BJP | लखनऊ : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजपच्या आणखी एका नेत्यानं खळबळजनक विधान केलं आहे. प्रेम ब्रिम काही असत नाही. केवळ सेक्सचं आकर्षण असतं, असं धक्कादायक विधान योगी आदित्यनाथ सरकारमधील राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला (Pratibha Shukla) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता … Read more

Published On: 

🕒 1 min read

BJP | लखनऊ : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजपच्या आणखी एका नेत्यानं खळबळजनक विधान केलं आहे. प्रेम ब्रिम काही असत नाही. केवळ सेक्सचं आकर्षण असतं, असं धक्कादायक विधान योगी आदित्यनाथ सरकारमधील राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला (Pratibha Shukla) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ मोहिमेअंतर्गत इटावा येथे राष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, “मुली नटून सजून घरातून निघाल्या तर समजून जा काही तरी गडबड आहे. त्यांना सांभाळण्याची गरज आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “मुलांनी प्रेमा ब्रिमाच्या भानगडीत पडू नये. त्यांनी आपल्या शिक्षणावर लक्ष द्यावं. प्रेम ब्रिम काही नसतं. ते केवळ अपोझिट सेक्सचं आकर्षण असतं. त्यापासून दूर राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी प्रेमाची स्वप्न पाहण्याऐवजी आपल्या ध्येयाची स्वप्न पाहा. मेहनत करा आणि लक्ष्य गाठा असं विद्यार्थ्यांना खुलेपणाने सांगा, असं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे.”

यावेळी बोलताना प्रतिभा शुक्ला यांनी मुलांना मोबाईलपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. मोबाईल ही एक नशा आहे. त्याचा अधिक वापर हानिकारक आहे. मुलींनी स्वत:ला सुरक्षित ठेवून आपलं चारित्र्य चांगलं ठेवलं पाहिजे. प्रेमच करायचं असेल तर आपल्या ध्येयावर करा. मुलींनी स्वावलंबी बनलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

India Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या