Job Recruitment | भारत सरकारच्या ‘या’ विभागात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: अनेकजण सरकारी नोकरी (Government Job) च्या शोधात असतात. मात्र, माहितीच्या अभावामुळे अनेकांना सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे आम्ही इच्छुक उमेदवारांपर्यंत सरकारी नोकरीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या सरकारच्या दूरसंचार विभागात नोकरीची संधी उपलब्ध आहे. भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागात सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 270 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या 270 रिक्त जागा उपविभागीय अभियंता पदाच्या आहेत. या पदासाठी पात्रताधारक उमेदवार 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या या भरती प्रक्रियेसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी आणि 8 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशभरात होणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना ADG- 1 (A & HR), DGT HQ, रूम नंबर 212, 2 रा मजला, UIDAII इमारत, काली मंदिराच्या मागे, नवी दिल्ली, पिनकोड- 11001 या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागात सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार dot.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या