Makeup Remover | चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी हळदीचा ‘या’ करा प्रकारे वापर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Makeup Remover | टीम महाराष्ट्र देशा: घरातून बाहेर पडताना चेहऱ्यावर सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि क्रीम लावणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच घरी परतल्यानंतर चेहरा स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण घरातून बाहेर पडल्यावर चेहऱ्याला धूळ, प्रदूषण, सूर्यप्रकाश इत्यादी गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे घरातून बाहेर पडताना आपण चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या उत्पादनांचा वापर करत असतो. अशात घरी परतल्यानंतर चेहरा स्वच्छ करणे खूप आवश्यक असतं. कारण जर आपण चेहरा स्वच्छ नाही केला, तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक लोक चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी आणि चेहरा स्वच्छ करण्यासाठी रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. पण या रसायनयुक्त उत्पादनामुळे चेहऱ्याला हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी आणि चेहरा स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. यासाठी तुम्ही घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या हळदीचा वापर करू शकतात. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेची निगा राखण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही चेहरा स्वच्छ करण्यासाठी हळदीचा वापर पुढीलप्रमाणे करू शकतात.

कच्चे दूध आणि हळद

कच्चे दूध त्वचेसाठी नैसर्गिक क्लिंझर म्हणून काम करते. कच्च्या दुधाचा वापराने त्वचेवरील अतिरिक्त डाग देखील दूर होऊ शकतात. कच्चे दूध आणि हळदीच्या मदतीने चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी आणि चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला दुधामध्ये चिमूटभर हळद मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर कापसाच्या मदतीने तुम्हाला कच्चे दूध आणि हळदीचे मिश्रण चेहऱ्यावर लावावे लागेल.

हळद आणि गुलाब जल

चेहरा साफ करण्यासाठी हळद आणि गुलाब जल एक उत्तम पर्याय आहे. कारण गुलाब जलमध्ये अँटी ऑक्सिडंट आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात. हे गुणधर्म त्वचेला खोलवर साफ करण्यास मदत करतात. हळद आणि गुलाब जल फेस क्लिंझर बनवण्यासाठी तुम्हाला तीन चमचे गुलाबजलामध्ये चिमूटभर हळद मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर कापसाच्या मदतीने तुम्हाला सामान्य फेस क्लिंझरप्रमाणे याचा उपयोग करावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पंधरा मिनिटानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवू शकतात.

हळद आणि लिंबाचा रस

हळद आणि लिंबाच्या रसाच्या मदतीने चेहरा साफ करण्यासाठी तुम्हाला दोन चमचे लिंबाच्या रसामध्ये एक चमचा गुलाबजल आणि चिमूटभर हळद मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर चेहरा साफ करण्यासाठी तुम्हाला कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे लागेल. लिंबाच्या रसामध्ये विटामिन सी आणि अँटी ऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेला साफ करण्यास मदत करतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या