Share

MNS | “संजय राऊत वेड्यांच्या रूग्णालयात होते की…?”; मनसेच्या ‘या’ नेत्याचा खोचक टोला 

MNS | मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काल (१९ जाने) मुंबई दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदी यांनी काल मुंबईत विविध विकासकामांचे उद्घाटन केले. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्यावर सडकून पाहायला मिळाली.

दरम्यान, या मुद्द्यावरून घे भरारी सभेत मनसे (MNS) नेते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत वेड्यांच्या रूग्णालयात होते की कोठडीत असे म्हणत गजानन काळे (Gajanan Kale) यांनी सवाल उपस्थित केला आहे.

“मागच्या सत्तेत असणाऱ्यांची असो की आता सत्तेत असणाऱ्याची या मुंबईने आणि मुंबईकरांनी फक्त उद्घाटनं पाहिली आहेत. मुंबईची तुंबई होत असताना याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. गेली २५ वर्ष या मुंबईची वाट ज्या सत्ताधाऱ्यांनी लावली आहेत त्यावर आदित्य ठाकरे आता पत्रकार परिषद घेत आहेत”, असा टोला गजानन काळे यांनी लगावला.

याला मनसे विरप्पन गँग असे म्हणते, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. “आता ही गँग सक्रीय झाली आहे. याच्याच गँगमध्ये असणारे अभिजीत बिचकुले म्हणजे संजय राऊत हे सकाळी येतात, त्यांना केवळ बेळगाव प्रश्नाचे पडले आहे, असे म्हणत गजानन काळे यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलेत. संजय राऊत वेड्यांच्या रूग्णालयात होते की कोठडीत?”, असा सवाल करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या :

MNS | मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काल (१९ जाने) मुंबई दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदी यांनी काल मुंबईत …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now