Satyajeet Tambe | “काँग्रेसने विचारपूस करायला हवी होती”; निलंबनाच्या कारवाईवर सत्यजित तांबेंची खंत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Satyajeet Tambe |  अहमदनगर : राज्यात सध्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यावरून काही मतदार संघात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी काँग्रेसकडून अर्ज न भरता सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरला.

नाशिकमधील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू होती. या सर्व चर्चेचा खुलासा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतिने बैठक बोलावण्यात आली. या बैठकीनंतर कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सुधीर तांबे यांच्यासह सत्यजित तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आल्याचे म्हंटले.

कॉंग्रेस पक्षाने केलेल्या या कारवाईवरुन सत्यजित तांबे प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केली आहे. “काँग्रेसने निलंबित करण्याचं दुःख झालं आहे, आमच्या परिवाराला काँग्रेसमध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहे, काँग्रेसने विचारपूस करायला पाहिजे होती”, अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

“आम्ही काम करताना कधी जातिवाद केला नाही, आम्ही सर्वांना समान न्याय दिला आहे. नाशिक मतदारसंघात आमच्या परिवाराचं मोठं ऋणानुबंध आहे. सत्ता आम्ही जन्मापासून पाहत आलो आहोत. त्यामुळे योग्य वेळी उत्तर देऊ”, असा इशारा सत्यजित तांबेंनी काँग्रेसला दिला आहे.