Auto Expo 2023 | अरेच्चा! नॅनोची धाकटी बहीण, ऑटो एक्सपोमध्ये भारतातील पहिल्या सोलर कारचे अनावरण

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Auto Expo 2023 | नोएडा: दिवसेंदिवस वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत चालला आहे. त्याचबरोबर प्रदूषणाची लेव्हल धोकादायक पातळीवर पोहोचल्याने लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. हि बाब लक्षात घेऊन ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) मध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने सादर केली आहे. त्याचबरोबर ऑटो एक्सपोमध्ये भारतातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार (EVA) देखील सादर करण्यात आली आहे. ही कार दिसायला नॅनोसारखी आहे. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

पॉवर रेंज आणि पॉवर पॅक

भारतातील दोन दरवाजांच्या पहिल्या इलेक्ट्रिक सोलर कारमध्ये दोन पौढ आणि एका लहान मुलाला बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे. या सोलर कारमध्ये 14kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. ही कार एका पूर्ण चार्जवर 250 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. या कारच्या बॅटरीला सोलर पॅनल किंवा वीज दोन्ही पद्धतीने चार्ज केल्या जाऊ शकते. 14kWh बॅटरी पॅक जलद चार्जिंगने 45 मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज होऊ शकतो.

फीचर्स

भारतातील पहिल्या सोलर इलेक्ट्रिक कारमध्ये लिक्विड कुल्ड PMSM मोटर वापरण्यात आली आहे. ही मोटर 6kW पॉवर देण्यास सक्षम आहे. या कारमध्ये रिव्हर्स कॅमेरा, कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टम, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग इत्यादी वैशिष्ट्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये मोनोकोक चेसिस, ड्रायव्हर एअरबॅग आणि IP-68-प्रमाणित पॉवरट्रेन इत्यादी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

या कारच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आलेले आहे. हे सोलर पॅनल एका विशिष्ट पद्धतीने बसवण्यात आले आहे. त्यामुळे ते लवकर दिसून येत नाही. ही कार बॅटरी आणि सोलर पॅनल दोन्हींच्या माध्यमातून चालवता येते. कंपनी ही कार भारतीय बाजारात 2024 मध्ये लाँच करू शकते.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe