Kirit Somaiyya | मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आता किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य केले आहे.
किशोरी पेडणेकर यांनी फसवणूक कशी करावी, फ्रॉड कसा करावा? या सगळ्याची मोनोपली घेतली आहे. किशोरी पेडणेकर यांनी केलेले 3 करार खोटे आहेत. हे तिन्ही करार SRA संदर्भातले आहे. अनिल परब यांनी सदानंद कदमसोबत करार केला त्यांनीही असंच फ्रॉड, फोर्जरी आणि चिटिंग केली आहे. संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांनीही हेच केले आहे, असे गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केले आहेत.
“मी आता देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की या तिघांकडे लक्ष द्या. फॉर्जरी करणे, खोटे करार करणे, लोकांना फसवणे हे करत आहेत. किशोरी पेडणेकरांनी लिव्ह अँड लायसन्स केले आहे. 2017 मध्ये झालेले आहे. हा करार कोणामध्ये झाला तर संजय महादेव अंधारी यांच्यासोबत. या करारावरची संजय अंधारी यांची सही खोटी आहे. फोर्जरी केल्याचे संजय अंधारी यांनीही कबूल केले आहे. अशा व्यवहारांमध्ये बरबटलेल्या किशोरी पेडणेकरांना उद्धव ठाकरेंनी महापौरपद दिलंच कसं?, असा संतप्त सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.
“असाच एक करार त्याच जागेचा हा किशोरी पेडणेकरांनी केला. किशोरी पेडणेकर आणि उद्धव ठाकरे हे काहीही करू शकतात. आत्ता जी चौकशी सुरू झाली त्यानंतर हा करार त्यांनी SRA आणि मुंबई महापालिकेला दिला. याच जागेचा अगदी तोच मजकूर 2017 च्या करारातही आहे. या करारात काय लिहिले आहे, स्टँप पेपर नंबर 943322 दोन्ही पण संजय अंधारींसोबतच. दोन्ही खोटी आहेत”, असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
“संजय अंधारी एकाच जागेचे 2017 मध्ये एक करार करतात दुसरा करार 12 ऑगस्ट 2017 सगळं तेच तेच या ठिकाणी आहे. एकाच जागेचे दोन करार कसे केले? या दोन करांरांमध्ये एक खरे संजय अंधारी आहेत दुसरे खोटे संजय अंधारी आहेत जे किशोरी पेडणेकरांनी उभे केले आहेत”, असेही किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Sawant | मोठी बातमी! माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या गाडीला अपघात
- Travel Tips | भारतीय कला आणि संस्कृती बघायची असेल, तर फेब्रुवारी महिन्यात ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Satyajeet Tambe | “काँग्रेसने विचारपूस करायला हवी होती”; निलंबनाच्या कारवाईवर सत्यजित तांबेंची खंत
- Sajay Raut | “देशात काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊच शकत नाही”- संजय राऊत
- Auto Expo 2023 | अरेच्चा! नॅनोची धाकटी बहीण, ऑटो एक्सपोमध्ये भारतातील पहिल्या सोलर कारचे अनावरण